Thursday, January 20, 2011

महाभारत - अध्याय १

महाभारत या एकाच विषयावर गेल्या काही दिवसात बरेच ग्रंथ वाचून झाले... पण अजूनपर्यंत महाभारत एकदाही नाही वाचले याची प्रांजळ कबुली दिली पाहिजे..
सुरुवात होते ती मृत्युंजय पासून. 'ययाती', राधेय, युगंधर अश्या अनेक कादंबऱ्या आणि युगांत, महाभारत एक सूडाचा प्रवास आणि व्यासपर्व अश्या विश्लेषणपर पुस्तकांच्या वाचनातून महाभारता बद्दलची ओढ अजून वाढते.
ययाती हे महाभारतातील एक उपाख्यान आहे..वि.स.खांडेकर यांनी या उपख्यानाचे धागेदोरे कालिदासाच्या शाकुंतल मधील कण्व मुनींच्या एका आशीर्वचनाच्या आधारे अगदी स्वतंत्रपणे गुंफले आहेत.. परंतु हे उपाख्यान पूर्णतः वेगळे आहे.. ययाती वाचल्यानंतर आपण शर्मिष्ठेच्या प्रेमात पडतो आणि देवयानी कडे एक खाष्ट बायको याच नजरेने पाहतो.. महाभारतातील उपाख्यान नेमके याच्या उलट सांगते..
तिथे देवयानी पतिव्रता ठरते..
मग हे उपाख्यान त्यांच्या समोर असताना त्यांनी अशी का रचना केली कि ज्यामध्ये शर्मिष्ठा हि त्या पुस्तकची नायिका बनते? मला हा प्रश्न नेहेमी पडतो.. त्यांच्या प्रस्तावनेत काही अंशी उत्तर सापडते.. पण शाकुंतल प्रमाण मानायचे आणि कथाभागातील पात्रांची implications दुर्लक्षित ठेवायचे, असे त्यांनी का केले हा पुढचा प्रश्न मला पडतो.. कुणीतरी म्हणेल कि त्यांनी समाज जीवनाचे प्रतिबिंब म्हणून हि कादंबरी लिहिली.. परंतु ज्या काळातील समाज जीवनावर त्यांनी कादंबरी लिहायचे ठरवले त्या काळातील ययाती, देवयानीची पत्रे त्यांनी कालानुरूप बदलली किंवा त्यांच्याच शब्दात सांगायचे तर देवयानी तर त्यांना सर्वात शेवटी लिहिलेले पात्र आहे, तेव्हा त्यांनी शर्मिष्ठा पण त्या काळनुरूप का नाही बदलली? १९१३ सालची शर्मिष्ठा तशीच्या तशी त्यांच्या कादंबरीत दिसते.. मग ती खरेच शार्मिष्ठेची प्रेमकथा म्हणून घ्यावी कि १९५२ सालच्या देशाच्या समाजजीवनाचे प्रतिबिंब म्हणून घ्यावी असा मला प्रश्न पडतो.. कदाचित यातील सर्वच मुद्दे, प्रश्न बाळबोध असतील.. पण मला असे प्रश्न नेहेमी पडतात..

क्रमशः

Wednesday, September 1, 2010

कविराज भूषण

नमस्कार..
मी प्रथमच असे सार्वजनिकरित्या लिखाण करतोय.. काही चूकभूल असेल तर आपण जरूर योग्य त्या सूचना कराव्यात..

बाळ कोल्हटकर यांनी केलेल्या कविराज भूषणाच्या कवितेचा अनुवाद आज मी आपल्यासाठी देतो आहे.

बाल कोल्हटकर यांच्या नाटकामधील हि अनुवादित कविता आहे. या कवितेमध्ये रायगडावर असणाऱ्या वनस्पती, फळझाडे, फुलझाडे, वेली इत्यादि तसेच शेवटी गंगासागर जलाशय हा आकाशातील गंगेहुनही कसा
श्रेष्ठ आहे याचे चित्रण केले आहे. शेवटचा भाग हा मूळ पुस्तकात नाही.
सध्या माझाकडे भूषणाची मूळ कविता नसलाकारणाने ती मी इथे देऊ शकत नाही. पण कोल्हटकर यांनी केलेला अनुवाद हाही तितकाच सुंदर आहे.


जटा बांधुनी नटली धरणी
विशाल पलाश वृक्षांचा |
लटा तरुंना बिलगुनी डुलती ,
नाच चालतो छायेचा ||
कुठे बांधल्या जलाशयावर
जिना शोभतो दगडांचा |
विहार चाले त्या पाण्यावर
चक्रवाक, कधी हंसांचा ||
कोठे चंदन,कुठे चमेली
गंध दरवळे चाफ्याच्या |
लवंगवेली कुठे वेलची
लक्ष न पुरतो संख्येचा ||
चंद्रमुखीच्या सवेच जेव्हा
चंद्र उगवतो पूर्वेचा |
असे वाटते कमल फुलांनी जन्म घेतला ,
आजच उदरी गंगेच्या ||
वरती गंगा खाली सागर
वरती तारे येथे कमले |
वरचे तारे खाली येती
प्रतिबिंबांना रूपे पडती ||
म्हणून म्हणतो भूषण हे कि
आकाशाच्या गंगेहून हि
गंगासागर भाग्याचा!!